आंदोलकाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर प्रशासनाची धावपळ

Foto
सागर प्रकाशनचे साजवार्ता
Page No.: 6
Date: 19/11/2026
रोहित पठारे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) रोहित पठारे प्रकरण जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने बुधवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा थरार घडला. प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करत संतप्त आंदोलक योगेश वाघमारे याने कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
रोहित पठारे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय प्रक्रियेला गती द्यावी, या मागणीसाठी तरुणांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने - योगेश वाघमारे याने हे टोकाचे पाऊल उचलले. तब्बल ४० मिनिटे हा हाय-व्होल्टेज थरार सुरू होता. या घटनेमुळे कार्यालय परिसरात मोठा तणाव निर्माण होऊन पोलीस आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी तातडीने मध्यस्थी करत आंदोलकांशी संवाद T साधला. त्यांनी मागण्यांसंदर्भात प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन पत्र न दिले. या आश्वासनानंतर योगेशने आत्महत्येचा प्रयत्न थांबवला आणि आंदोलन अधिकृतरीत्या मागे घेण्यात आले. त्यानंतर कार्यालयातील कामकाज पूर्वपदावर आले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions